स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत १२ ठराव करण्यात आले. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये अनुदान, शक्तिपीठ महामार्ग रद्द करणे, गोपीनाथ मुंडे विमा रक्कम पाच लाखांपर्यंत वाढवणे आदी मागण्यांचा समावेश आहे. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ही बैठक पुण्यात पार पडली.
स्वाभिमानीच्या बैठकीत १२ ठराव; शेतकऱ्यांना २ लाखांची मागणी
Source: Agrowon