शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सलग चौथ्या दिवशी सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आयोगाने 2018 ची पक्षघटना दुर्लक्षित करून आधीच निष्कर्ष ठरवल्याचा आरोप केला. आयोगाने कागदपत्रे योग्य प्रकारे न पाहता निर्णय दिल्याचा दावा त्यांनी केला.
शिवसेना चिन्ह प्रकरण: सिब्बल यांचा आयोगाच्या निर्णयावर हल्लाबोल
Source: Pudhari