नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महासिंहस्थ २०२७ च्या जनजागृतीसाठी गणेशोत्सवात 'महासिंहस्थ गणेश मंडळ स्पर्धा' आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सात विषयांवर आधारित या स्पर्धेत पाच श्रेणींसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये, तर नावीन्यपूर्ण संकल्पनेसाठी पाच लाख रुपयांचा विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गणेश मंडळांच्या सूचनांनंतर उपक्रमाचे अंतिम स्वरूप निश्चित केले जाणार आहे.
गणेशोत्सवातून महासिंहस्थ जनजागृती; मंडळ स्पर्धेचा प्रस्ताव
Source: Prahaar