मुंबईतील 24 वर्षीय रिद्धी ठक्कर हिचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात बुधवारी पहाटे झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला. बस्तरच्या सहलीसाठी गेलेल्या दुचाकीस्वारांच्या ग्रुपमध्ये ती होती. मागून आलेल्या भरधाव ट्रेलरने तिच्या दुचाकीला धडक दिली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, तर ट्रेलर चालक पळून गेला.
मुंबईच्या तरुणीचा छत्तीसगडमध्ये अपघातात मृत्यू
Source: Zee 24 Taas