मध्य प्रदेशातील पन्ना येथे सात मजुरांना १६.९६ कॅरेटचा नैसर्गिक हिरा सापडला आहे. दोन वर्षांपूर्वी भाड्याने घेतलेल्या खाणीतून हा हिरा मिळाला. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या लिलावात त्याला किमान ५० लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे. विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून १२ टक्के रॉयल्टी वजा करून उर्वरित रक्कम सर्व मजुरांमध्ये समान वाटली जाईल.
पन्ना येथे ७ मजुरांना ५० लाखांचा हिरा सापडला
Source: BBC Marathi