भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये काढण्यात आलेल्या तिरंगा पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पावसाच्या संततधारेतही हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी वातावरण भारावले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीचा जागर करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.
पनवेलमध्ये तिरंगा पदयात्रेला पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद
Source: Prahaar