मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबई आणि ग्रेटर नोएडा येथून सुमारे ९.४ कोटी रुपये किमतीचे ४.७९८ किलो मेथॅम्फेटामाइन जप्त केले. वांद्रे येथून एकाला अटक करून त्याच्याकडून २.०५ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. चौकशीतून ग्रेटर नोएड्यातील कारखान्यावर छापा टाकून आणखी २.७४८ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोन परदेशी महिलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई-ग्रेटर नोएडामध्ये ९.४ कोटींचे मेथॅम्फेटामाइन जप्त
Source: Prahaar