कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाय फ्रॅक्चर झालेल्या रुग्णाला प्लास्टर नसल्याचे सांगून पुठ्ठ्याचा आधार देण्यात आला. कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्याचा आरोप रुग्णाच्या मुलाने केला आहे. मनसे नगरसेवकांनी चौकशीची मागणी केली असून, त्वरित कारवाई न झाल्यास रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
रुग्णालयात प्लास्टरऐवजी पुठ्ठ्याचा आधार, KDMC रुग्णालय वादात
Source: Lokmat