पॅकबंद खाद्यपदार्थांवर साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण दाखवणारे इशारा लेबल लावण्यास टाळाटाळ केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने FSSAI आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. न्यायालयाने अंतिम निर्णयासाठी दोन आठवड्यांची शेवटची मुदत दिली असून, सार्वजनिक आरोग्याला व्यावसायिक हितसंबंधांपेक्षा प्राधान्य द्यावे लागेल, असे स्पष्ट केले.
पॅकबंद अन्न लेबल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने FSSAIला दिली दोन आठवड्यांची मुदत
Source: Prahaar