संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब झाले असून या अधिवेशनात १२ विधेयके मंजूर करण्यात आली. मात्र, विरोधकांच्या गोंधळामुळे अपेक्षित चर्चा होऊ शकली नाही, असा आरोप सरकारने केला. लोकसभेत केवळ १९ टक्के आणि राज्यसभेत ३९ टक्के कामकाज झाले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
पावसाळी अधिवेशनात १२ विधेयकांना मंजुरी, विरोधकांच्या गोंधळावर सरकारची टीका
Source: Lokshahi Marathi