राज्यातील आजारी साखर कारखान्यांच्या कर्जवापरातील उल्लंघनाची चौकशी करणाऱ्या समितीने सात महिन्यांत अहवाल दिला नाही. त्यामुळे कारवाई रखडली असून, सहकार आयुक्तांचा समावेश करून समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. नव्या समितीला दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
साखर कारखान्यांच्या चौकशीत चालढकल, समितीचे पुनर्गठन
Source: Agrowon