खानदेशात मेअखेर व जूनच्या सुरुवातीला लागवड केलेल्या पूर्वहंगामी कापसाची वाढ चांगली आहे. शेतकरी आंतरमशागत, तणनियंत्रण आणि रासायनिक खते देण्यात व्यस्त आहेत. मात्र, पुरेशा पावसाअभावी पिकाच्या वाढीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत काही ठिकाणी मजूरटंचाई जाणवली आहे.
खानदेशात पूर्वहंगामी कापसाला खतांची लगबग
Source: Agrowon