धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार कैलास पाटील हे 'ऑपरेशन टायगर 2'चा भाग असल्याचे संकेत दिले. पाटील यांनी चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत केलेल्या आरोपांना उत्तर देताना सरनाईक म्हणाले, याच कॅमेऱ्यांतून पाटील यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून ऑपरेशन यशस्वी करू. यापूर्वी खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.
कैलास पाटील ऑपरेशन टायगर 2 चा भाग; पालकमंत्र्यांचा टोला
Source: Sarkarnama