पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांच्या पावसानंतर अनेक भागांत उघडीप मिळाली आहे, मात्र घाटमाथा आणि धरणक्षेत्रांत सरी सुरू आहेत. मुळशी धरणक्षेत्रात २४ तासांत ११० मिमी पाऊस नोंदवला गेला. चासकमान, पानशेत, खडकवासला, भाटघर आणि वीर धरणे १०० टक्के भरली असून, सहा धरणांतून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. उघडीपमुळे शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या आंतरमशागतीला वेग मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर सरी सुरूच
Source: Agrowon