इंडोनेशियात शनिवारी सकाळी 7.7 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने धरती हादरली. या भूकंपात किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक इमारती कोसळल्या. त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता, परंतु नंतर तो मागे घेण्यात आला. भूकंपाचे केंद्र फ्लोरेस बेटाजवळ समुद्रात 10 किलोमीटर खोलीवर होते.
इंडोनेशियात 7.7 तीव्रतेच्या भूकंपाने हादरले, अनेक ठार
Source: TV9 Marathi