मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावर १५ ऑगस्टपासून २२ लोकल १२ ऐवजी १५ डब्यांच्या धावणार आहेत. त्यामुळे प्रवासी क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार असून, १५ डब्यांच्या लोकलची संख्या ३२ वरून ५४ होणार आहे. अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि खोपोली मार्गावरील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
मुंबई लोकल: १५ ऑगस्टपासून २२ नव्या १५ डब्यांच्या लोकल
Source: Lokshahi Marathi