परभणी गुंतवणूक परिषदेत १६२ उद्योजकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून १,६२२ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामुळे १५,६१७ स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून, येत्या दसऱ्यापर्यंत उद्योगांच्या इमारत बांधकामाची पायाभरणी केली जाईल. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी स्थानिक उद्योजकांना चालना देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
परभणी गुंतवणूक परिषदेत १,६२२ कोटींची गुंतवणूक; १५,६१७ रोजगार संधी
Source: Prahaar