फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांना जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. गुंडगिरी, दहशत निर्माण करणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली आहे. साबळे यांनी २०२४ मध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत लाखो मते मिळवली होती.
मराठा आंदोलनातील नेते मंगेश साबळे यांना दोन वर्षांसाठी हद्दपार
Source: Sarkarnama