सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कोळोशी गावात पावणादेवी मंदिराच्या प्रांगणात नागपंचमीच्या दिवशी पारंपरिक 'भल्ली भल्ली भावय' हा खेळ मोठ्या उत्साहात खेळला गेला. चिखलात एकमेकांना लोळवत, ढोल-ताशांच्या गजरात हा खेळ रंगला. यावेळी स्थानिकांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कणकवलीत नागपंचमीला चिखलात भल्ली भावय खेळाचा उत्साह
Source: Pudhari