मीरा रोडमधील गोल्डन नेस्ट परिसरात मेट्रोच्या कामादरम्यान स्लॅब कोसळून रस्त्यावर पडला. त्यावेळी तेथून जाणारी शाळेची व्हॅन थोडक्यात बचावली, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित करत कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे.
भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; शाळेची व्हॅन थोडक्यात बचावली
Source: Lokshahi Marathi