महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेत राज्यातील सुमारे 21.25 टक्के म्हणजे 2.08 कोटींहून अधिक मतदार वगळले जाण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरांत 35.24 टक्के मतदारांचा समावेश असून, अंतिम आकडेवारी मंगळवारी जाहीर होणार आहे. प्रारूप यादी 24 ऑगस्टला प्रसिद्ध होणार असून, वगळलेल्या मतदारांना हरकत नोंदवण्याची संधी असेल.
SIR प्रक्रियेत मुंबईतील 35 टक्के मतदार वगळण्याची शक्यता
Source: Saamana