बेस्ट कर्मचाऱ्यांनी प्रलंबित वेतन करार, सातवा वेतन आयोग, ग्रेच्युइटी आणि इतर मागण्यांसाठी १८ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे. मुंबईच्या बससेवेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांचा १८ ऑगस्टपासून बेमुदत संप
Source: Lokshahi Marathi