नव्या संशोधनानुसार, मोहम्मद अली जिना यांच्या गंभीर टीबीच्या आजाराची माहिती 1946 पासून काही डॉक्टरांना होती, पण त्यांनी ती गुपित ठेवली. ही माहिती ब्रिटिश आणि भारतीय नेत्यांना वेळीच मिळाली असती, तर भारताची फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती टळू शकली असती, असा दावा करण्यात आला आहे. आता या डॉक्टरांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यासाठी नामांकित करण्यात आलं आहे.
जिनांच्या आजाराचं गुपित कळलं असतं, तर पाकिस्तान तयार झाला नसता?
Source: BBC Marathi