बीड जिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर 19 वर्षीय संध्या गायकवाड यांच्या पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचे समोर आले. प्रकृती बिघडल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात दुसऱ्या शस्त्रक्रियेत त्या वस्तू काढण्यात आल्या. कुटुंबीयांनी वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप केला असून संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन चौकशी सुरू केली आहे.
बीडमध्ये प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात हातमोजे, रुमाल
Source: TV9 Marathi