सर्पदंश आता अधिसूचित आजार; आबिटकर यांची घोषणा

सर्पदंश आता अधिसूचित आजार; आबिटकर यांची घोषणा

महाराष्ट्र शासनाने सर्पदंशाला अधिसूचित आजार म्हणून घोषित केले आहे. यामुळे सर्व शासकीय, खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय व्यावसायिकांना प्रत्येक संशयित किंवा निश्चित घटनेची नोंद आरोग्य प्राधिकरणाकडे करणे बंधनकारक ठरणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांचे प्रभावी नियंत्रण, वेळेवर उपचार आणि सर्पविष प्रतिबंधक लस (एएसव्ही) उपलब्धतेचे नियोजन अधिक सक्षम होणार आहे.

Source: Deshdoot

More in Health & Wellness

Read the live feed on ZapIndies