वांद्रे रेक्लमेशन येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाचे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रुपांतर करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला मुंबई फुटबॉल असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याचिकेत पालिकेने नोटीस, जनसुनावणी किंवा व्यवहार्यता अभ्यास न करता निर्णय घेतल्याचा आरोप आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर गुरुवारी तातडीची सुनावणी होणार आहे.
वांद्रे फुटबॉल मैदान वाचवण्यासाठी मुंबई फुटबॉल असोसिएशनची हायकोर्टात धाव
Source: Pudhari