मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई सुरू होणार आहे. चालकांची मराठी भाषेची तपासणी करून व्हिडिओ शूटिंग केले जाईल. १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत संपल्याने आता न बोलणाऱ्यांचा बॅज आणि परवाना रद्द केला जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रात राहण्यासाठी मराठी अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
मराठी न बोलणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई
Source: Lokshahi Marathi