मुंबईतील विकास प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी वांद्रे येथे तिरंगा आंदोलनाची हाक दिली आहे. कोणताही राजकीय झेंडा न वापरता खुल्या जागा आणि मैदानांच्या संरक्षणासाठी नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. चाकण आणि हिंजवडीतील समस्यांचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या विकास मॉडेलवर प्रश्न उपस्थित केले.
आदित्य ठाकरेंची वांद्रे येथे तिरंगा आंदोलनाची हाक
Source: Lokshahi Marathi