बीड जिल्हा रुग्णालयात सी-सेक्शननंतर १९ वर्षीय संध्या गायकवाड यांच्या पोटात हातमोजे आणि टिश्यू पेपर राहिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. प्रकृती बिघडल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात पुन्हा शस्त्रक्रिया करून वस्तू काढण्यात आल्या. जिल्हा शल्यचिकित्सकांनी संबंधित डॉक्टरांना नोटीस बजावून चौकशी सुरू केली आहे.
सी-सेक्शननंतर पोटात हातमोजे, नॅपकिन; तरुणीची प्रकृती गंभीर
Source: Lokshahi Marathi