नाशिकमध्ये भाजपच्या संघटनात्मक बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निफाडचे माजी आमदार अनिल कदम उपस्थित होते. त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळताना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेण्यासाठी आल्याचे सांगितले. मात्र, यापूर्वीही अशा चर्चा झाल्याने निफाडच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनिल कदमांची भाजप बैठकीत उपस्थिती, प्रवेशाच्या चर्चांना उधाण
Source: Sarkarnama