गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या मागणीत वाढ झाल्याने महाराष्ट्रातील घाऊक बाजारात दर ७,५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. हिंगोलीत किरकोळ दर ७५ रुपये किलो, तर वाशिममध्ये ८० रुपये किलो झाला आहे. मिठाई उत्पादक आणि ग्राहकांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
सणासुदीपूर्वी साखर दरात वाढ, घाऊक बाजारात ७,५०० रुपये प्रति क्विंटल
Source: Lokshahi Marathi