मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. समितीने त्यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केले असून, पद रद्द झाल्याने महापालिकेत खळबळ माजली आहे. मात्र, हा निर्णय अद्याप सभागृहाच्या पटलावर आलेला नसल्याने अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही.
विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द
Source: Zee 24 Taas