पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमात राहुल गांधींनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी नेहा राठोड या तरुणीने सरकारला प्रश्न विचारल्याने शिव्या दिल्या जात असल्याची तक्रार केली. तर मांजरी येथे उपोषण करणाऱ्या विद्यार्थिनीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सांगत निवेदन दिले. राहुल गांधींनी महिलांवरील अन्याय आणि आर्थिक हिंसेबाबतही भाष्य केले.
पुण्यात राहुल गांधींचा विद्यार्थिनींशी संवाद; महिला सुरक्षेवर भाष्य
Source: ABP Majha