चाकण एमआयडीसीतील समस्यांवरून वाद पेटला असून, माजी आमदार दिलीप मोहिते यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, उदय सामंत नावालाच मंत्री असून उद्योग खाते त्यांचे बंधू किरण सामंत चालवतात. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी चार दिवसांचे उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे घेतले आहे.
उदय सामंत नावालाच मंत्री; उद्योग खातं किरण सामंत चालवतात – दिलीप मोहिते
Source: Sarkarnama