पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांनी निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा व्हिडिओ व्हायरल केल्याने प्रशासनाने त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई सुरू केली आहे. शासनाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असून, निकृष्ट आहार पुरवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी होत आहे.
रेश्मा पारधी प्रकरण: निकृष्ट आहाराचा व्हिडिओ महागात, सेवा समाप्तीची कारवाई
Source: Mumbai Tak