विशाखापट्टणममधील खासगी शाळेत गुरुवारी 6 वर्षांच्या प्रणय तेजाचा वर्गात मृत्यू झाला. गृहपाठ पूर्ण न केल्याने शिक्षिका त्याच्यावर ओरडत असताना तो कोसळला. कुटुंबीयांनी शिक्षिकेने मारल्याचा आरोप केला असून पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत असल्याचे सांगितले.
विशाखापट्टणममध्ये शाळेत 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Source: BBC Marathi