मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा स्ट्राइव्हच्या उपक्रमांमुळे राज्यातील युवकांच्या कौशल्य विकासाला चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त केले. २०१५ पासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक येथे केंद्रे कार्यरत आहेत. आतापर्यंत ८ हजारांहून अधिक युवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, २७० आयटीआयमध्ये ड्युअल व्हीईटी कार्यक्रम राबविला जात आहे.
महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हमुळे कौशल्य विकासाला चालना
Source: Prahaar