दिल्ली उच्च न्यायालयाने जान्हवी कपूरशी संबंधित अश्लील सामग्री असलेले 552 URLs हटवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, एकाच वेळी 6,884 URLs हटवण्याची मागणी फेटाळत न्यायालयाने सर्व फॅन पेजेस बेकायदेशीर नसल्याचे स्पष्ट केले. न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांनी वेगवेगळ्या श्रेणींतील सामग्रीवर एकसारखा आदेश देता येणार नाही, असे म्हटले आहे.
जान्हवी कपूरच्या अश्लील कंटेंटवर हायकोर्टाचा कठोर निर्णय
Source: Divya Marathi