पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विसर्जनानंतर तरंगणाऱ्या, अर्धवट विसर्जित किंवा संकलित गणेशमूर्तींचे फोटो व व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यास बंदी घातली आहे. सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी ८ सप्टेंबर रोजी काढलेला हा आदेश १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान संपूर्ण पोलिस आयुक्तालय हद्दीत लागू राहील. धार्मिक भावना दुखावून सार्वजनिक शांतता बिघडू नये म्हणून हे पाऊल उचलले असून उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये कारवाई होईल.
गणेशमूर्तींचे विसर्जनानंतरचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करण्यास पिंपरी-चिंचवड पोलिसांची बंदी
Source: Pudhari