मुंबईतील वांद्रे परिसरात १५ सप्टेंबर रोजी पॅलेस्टाईन आणि गाझातील मुलांच्या समर्थनार्थ पतंग उडवण्याच्या कार्यक्रमानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीचा निषेध सहभागी विद्यार्थिनी हर्षदा बोराडे यांनी केला आहे. वॉरंटशिवाय घरात घुसून झडती घेतल्याचा आरोप त्यांनी केला असून, आता घरीही सुरक्षित वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी मात्र कायद्यानुसार चौकशी सुरू असल्याचे आणि कोणालाही बेकायदेशीर ताब्यात घेतले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पॅलेस्टाईन समर्थक पतंग कार्यक्रमानंतर तरुणीची पोलीस चौकशी
Source: BBC Marathi