मध्य महाराष्ट्रातील चक्रीय अभिसरणामुळे राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असून, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांना, तर रविवारी पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूर, नांदेडसह मोठ्या भागाला इशारा आहे. १९ सप्टेंबरपासून मान्सून परतीच्या प्रवासाला लागणार असून, ही राज्यातील शेवटची मोठी पावसाची बॅच असू शकते.
महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा येलो अलर्ट
Source: Mumbai Tak