मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर रविवारी (२० सप्टेंबर) सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अभियांत्रिकी व देखभाल कामांमुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या वळवल्या जातील तर काही शॉर्ट टर्मिनेट होतील. त्यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील. मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि पोर्ट मार्गावर मेगाब्लॉक नाही.
ठाणे-कल्याण मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; लोकल १०-१५ मिनिटे उशिराने
Source: Prahaar