इस्रायली संरक्षण दलात शस्त्रे आणि सैनिकांची कमतरता असल्याचे वृत्त आहे. तीन वर्षांच्या युद्धात मोठ्या प्रमाणात दारुगोळा वापरल्याने अनेक रणगाडे झिजले असून सैनिकांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. बजेट कपातीमुळे बोईंगकडून १२ अपाचे हेलिकॉप्टर खरेदीची योजना रखडली आहे. तज्ज्ञांच्या मते शस्त्रे संपलेली नाहीत, मात्र साठा कमी झाला आहे.
इस्रायली सैन्यात शस्त्रांचा तुटवडा; अपाचे करार रखडला
Source: Divya Marathi