मुंबई कोस्टल रोडवर BMW अपघात; तिघांचा मृत्यू, एक जखमी

मुंबई कोस्टल रोडवर BMW अपघात; तिघांचा मृत्यू, एक जखमी

मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे सुमारे ५.२० वाजता भरधाव BMW कार अपघातग्रस्त होऊन खाली कोसळली. मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जाणाऱ्या कारमधील चार तरुणांपैकी तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये धैर्य शेठ (१७), आदित्य जकासनिया (१९) आणि शनाई गुजर (२१) यांचा समावेश आहे. ताडदेव पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Crime

Read the live feed on ZapIndies