गणेशोत्सवानंतर कोकणातून परतीच्या प्रवासासाठी रायगड एसटी विभागाने २० आणि २१ सप्टेंबरसाठी एकूण ४३९ बसेस सज्ज ठेवल्या आहेत, तर गर्दी वाढल्यास २६५ अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. महाड, अलिबाग, पेण, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरूड आणि माणगाव या आठ आगारांमधून ही व्यवस्था करण्यात आली आहे. विभाग प्रमुख डॉ. सुहास चौरे यांनी प्रवाशांना एसटीनेच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
गणेशोत्सव परतीच्या प्रवासासाठी रायगड एसटीच्या ४३९ बसेस सज्ज
Source: Pudhari