सरकारी अनुदानाचा टप्पा मंजूर होऊनही विद्यार्थ्यांकडून निर्धारित शुल्कापेक्षा जादा रक्कम वसूल करणाऱ्या पुणे विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शिक्षण विभागाने दणका दिला आहे. पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील संबंधित शाळांनी अतिरिक्त शुल्क परत करावे, असे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने आदेश दिले आहेत. अनुदान वाढल्यास शुल्कात कपात अपेक्षित असूनही काही शाळांनी अंमलबजावणी केली नाही.
अनुदान मिळूनही जादा फी वसूल; पुणे विभागातील शाळांना परताव्याचे आदेश
Source: Sarkarnama