चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी दर ६.५ ते ७ टक्के राहू शकतो, असा अंदाज जेफरीज संस्थेने व्यक्त केला आहे. देशांतर्गत मागणी, बँक कर्जातील वाढ आणि सुधारित आर्थिक उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. जुलैमध्ये बँक कर्ज वार्षिक आधारावर १७ टक्के तर एमएसएमई कर्ज २४ टक्के वाढले. यापूर्वी मूडीजनेही सकारात्मक अंदाज वर्तवला होता.
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत राहण्याचा जेफरीजचा दावा
Source: Tarun Bharat