पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतून उमेदवारीची धडपड वाढली असताना शिवसेनेचे (शिंदे गट) इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांनी हुबळी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. डॉ. प्रभाकर कोरे आणि बसवराज बोम्मई यांच्या मध्यस्थीने ही भेट झाली. चिवटेंना पुढील आठवड्यात दिल्लीत निमंत्रित करण्यात आले असून, जागा शिवसेनेकडे जाणार की भाजप आपला दावा कायम ठेवणार, याकडे लक्ष लागले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी चिवटेंची अमित शाहांना भेट
Source: Deshdoot