दुष्काळी बैठकीत झोपल्याप्रकरणी भूवैज्ञानिक शिल्पा जनक निलंबित

दुष्काळी बैठकीत झोपल्याप्रकरणी भूवैज्ञानिक शिल्पा जनक निलंबित

अकोल्यातील दुष्काळी आढावा बैठकीत निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी अमरावती येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक शिल्पा जनक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीदरम्यान काही महिला अधिकारी झोपल्याची बातमी सर्वात आधी ‘लोकशाही मराठी’ने समोर आणली होती. निलंबन काळात त्यांना अमरावती कार्यालयातच उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies