कोल्हापुरातील मानेवाडी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान फटाक्यांवरून झालेल्या वादात 22 वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. संग्रामसिंह माने, रणजीत माने आणि दत्तात्रय माने या तिघांविरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला सहा टाके पडले आहेत.
कोल्हापुरात गणेश विसर्जनादरम्यान तरुणावर कोयत्याने हल्ला
Source: Lokshahi Marathi